जिल्ह्यात सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे गंभीर स्वरूप निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन आणि धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हाता - तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरपंच संघटना, चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष तथा कळमनाचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट व भरघोस आर्थिक मदत देण्याची आज दि 2 नोव्हेंबर ला 12 वाजता मागणी केली आहे.