आत्महत्या करण्याची धमकी देऊन एका अल्पवयीन विद्यार्थिनी वर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतून उघडकीस आली आहे. याप्रकरणी विपुल पाटील वय 26 वर्ष विरोधात पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीवरून पिरीतेची ओळख आरोपीसोबत स्नॅपचॅट या सोशल मीडिया ऍप वरून झाली. त्यानंतर विपुल तिला भेटायला आला आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.