उत्तर सोलापूर: ग्रामीण पोलिसांची अकलुज येथील 13 सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई...
कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या आदेशानुसार अकलुज येथील 13 सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मौजे अकलुज, ता. माळशिरस येथील लक्ष्मण बंदपट्टे व ज्ञानेश्वर काळे यांच्या टोळीने गेल्या काही वर्षांत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मालमत्ता जबरीने घेणे, शस्त्रासह दंगा करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभाग घेतला होता. टोळीवर पूर्वी हद्दपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.