चिखलदरा: दुनी येथील अंगणवाडी केंद्रात मुलांना दिल्या जाते ‘मुदतबाह्य तेल’ व खराब अन्न;सेविकेला नोटीस,कारवाईची टांगती तलवार
धारणी एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत मेळघाटातील दुनी येथील अंगणवाडी केंद्र क्र.-१ येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे आहे. लहान बालकांना व गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या आहारात मुदतबाह्य तेल आणि खराब झालेले साहित्य वापरात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी तक्रार केल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी केंद्राची पाहणी केली आणि आरोप खरे ठरले त्यामुळे अंगनवाडी सेविका श्रीमती मीना कांबडे यांना आज दुपारी १ वाजता नोटीसद्वारे खुलासा मांगण्यात आला.