परभणी: एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या
बंजारा समाजाचा एल्गार जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी बंजारा समाज संघर्ष समितीच्या वतीने आज मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता शहरातील शासकीय अध्यापक विद्यालय परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात जिल्हाभरातून हजारो बंजारा समाज बांधव भगिनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून मोर्चामध्ये सहभागी झाले होते.