"आम्ही सन्मानाने जगू पाहतोय, स्वतःचा व्यवसाय करू पाहतोय; पण शासन आणि बँक आमची फाईल पुढे सरकवायला तयार नाही. जर आम्हाला रोजगार मिळणार नसेल, तर प्रशासनाने आम्हाला अधिकृतपणे भीक मागण्याचा परवाना द्यावा," अशा शब्दांत तृतीयपंथी हक्क व कल्याण संरक्षण मंडळाच्या नाशिक विभाग सहअध्यक्षा शमिभा पाटील यांनी सोमवारी १९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'भिक मांगो' आंदोलन केले.