नागरिकांनी दिवाळीच्या सण उत्सवात सावध राहावे, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सा.पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांचे आवाहन
Beed, Beed | Oct 19, 2025 दिवाळीच्या काळात सावध राहा, पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांचे आवाहन बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील नागरिकांना दिवाळीच्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचे आवाहन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांनी केले आहे. या काळात अनेक कुटुंबे पूजा-अर्चा, सणसोहळ्याच्या तयारीत व्यस्त असतात. घरात दागदागिने, रोख रक्कम ठेवली जाते, तर काहीजण पूजा करून शेताकडे किंवा बाजारात जातात. अशा वेळी काहीजण घराचे दरवाजे नीट बंद न ठेवता बाहेर पडतात, आणि याच संधीचा फायदा चोरटे घेतात.