परभणी: ढगफुटी सदृश्य पावसामुळे साडेगावात ओढ्याला आलेल्या पुरामुळे घरांमध्ये शिरले पाणी; संसारउपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान
परभणी तालुक्यातील साडेगाव परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आल्याने साडेगावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूराचे पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने ग्रामस्थांचे संसारउपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले असून घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण गावात पाणी साचल्याने गावातील अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली असून आज रविवार 14 सप्टेंबर रोजी दुपारी तहसीलदार संदीप राजापुरे यांनी साडेगावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.