चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिका-यांकडून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा आढावा
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा आढावा अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 11 नोव्हेंबर ला 3 वाजता घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला पुरवठा विभागाचे राहुल वानखेडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, राज्य कृषी मुल्य आयोगाचे सदस्य बंडू गौरकर यांच्यासह अशासकीय सदस्य परशुराम कोंडूलवार, नंदिनी सोनारकर, संगिता बैद, श्री. मेहरकुरे, इरशाद हुसैन, प्रणय कांबळे आदी उपस्थित होते.