वर्धा: जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी:कामे अंतिम टप्प्यात:दुर्गा मातेच्या आगमनाची प्रतीक्षा
Wardha, Wardha | Sep 21, 2025 वर्धा जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू असून शहरातील विविध भागांत आकर्षक प्रवेशद्वार, रंगीबेरंगी मंडप लाइटिंग आणि सजावटीची कामे अंतिम टप्प्यात असल्याचे दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पाहायला मिळाले. दुर्गोत्सवानिमित्त संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे.