गंगापूर: गंगापूर-छत्रपती संभाजीनगर रोडवर, हॉटेल मल्हारच्या समोर अपघात
आज बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी माहिती मिळाली की गंगापूर-छत्रपती संभाजीनगर रोडवर, हॉटेल मल्हारच्या समोर हा अपघात झाला. अपघात झाल्याची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, अनिकेत मुळक आणि कल्पेश कराळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी गंगापूर घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. हे कार्य सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असून, त्यांच्या या तत्परतेमुळे जखमीला वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली.