अक्राणी: ऊस तोडणीचे आगाऊ घेतलेले पैसे परत न केल्यामुळे बोरवण फाट्या जवळून एकाचे अपहरण
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात बोरवण फाट्याजवळ १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी दीपक राड्या पावरा याचे अपहरण करण्यात आले आहे. ऊस तोडणीचे आगाऊ घेतलेले पैसे परत न केल्यामुळे हे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात पोपट दिलीप शेवाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.