महागांव तालुक्यातील हिवरा येथे ग्रामपंचायत च्या जागेवर सदानंद बन्सीलाल जयस्वाल यांनी अतिक्रमण करून त्या जागेवर भाजीपाल्याच्या गाड्याने दुकान थाटले. ग्रामपंचायत ने मागील काही दिवसापूर्वी संबंधित अतिक्रमण धारकाला नोटीसा बजावून ग्रामपंचायतला त्या जागेवर नागरिकांसाठी सार्वजनिक मुत्रीघर बांधायचे आहे असे सांगितले. जवळपास चार ते पाच वेळा नोटीसा बजावून ही अतिक्रमण धारक जुमानत नसल्याने अखेर ग्रामपंचायत कार्यालय हिवराच्या पदाधिकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या निवेदनातून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली