जळगाव: कुऱ्हा परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे पूरस्थिती, पुरात २५ वर्षीय तरुण बेपत्ता
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा, काकोडा परिसरात १६ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसानुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे शेती, गुरे व घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काकोडा येथे किरण सावळे हा २५ वर्षिय युवक पावसाच्या पाण्यामुळे नाल्याच्या पूरात वाहून गेल्याची घटना घडली असल्याची माहिती दि. १६ सप्टेंबर रोजी तहसील प्रशासनाने दिली.