चंद्रपूर: जिल्ह्यातील आसन (बू) येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी धरली भाजपची वाट
शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवून विकासकामे अधिक जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास हाच भाजपा सरकारचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले. आसन (बू) येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आज दि. ५ डिसेंबर ला सायंकाळी ४ वाजता भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी ते बोलत होते.