कोरेगाव: कोरेगाव शहरातील पूर्व भागात बिबट्याचा वावर; नागरिक भयभीत, वन विभागाने हाती घेतली शोध मोहीम
कोरेगाव शहरातील पूर्व भागात कुमठे फाटा, शिंदे कॉलनी, भवानी आई मंदिर परिसर आसरे, सरस्वती विद्यालय पुढील बाजू व मागील बाजू परिसरात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसला. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून तो आसरे गावच्या हद्दीत गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले आहे. वन विभागाने तात्काळ शोध मोहीम हाती घेतली, मात्र बिबट्या हाती लागला नाही. माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी सांगितले की, कोणावर ही बिबट्याचा हल्ला झाला नाही, अथवा कोणीही जखमी झाले नाही.