यावल: यावल नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उपोषण, स्वच्छता विभागातील मुकादमची बदलीची मागणी
Yawal, Jalgaon | Jan 6, 2026 यावल नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कामराज घारू यांनी उपोषण सुरू केले आहे. शहर व विस्तारित भागात स्वच्छता विभागाकडून दुर्लक्ष होत आहे व स्वच्छता विभागात भोंगळ कारभार आहे म्हणून येथील मुकादम ची बदली करण्यात यावी व या भोंगळ कारभाची चौकशी व्हावी या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.