अकोट: खापरखेडच्या जिल्हा परिषद शाळेत उभारली शिवसृष्टी;शाळेला इतिहासप्रेमींची भेट.
Akot, Akola | Oct 19, 2025 खापरखेड येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.या ठिकाणी नयनाताई सरोदे मॅडम कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामग्रीतून पर्यावरणपुरक गड व किल्ले बनवण्याचा त्यांचा हातखंडा आहे. शाळेमध्ये त्यांनी जवळपास 15 बाय 10 फुट अशा विस्तीर्ण जागेत किल्ल्याची प्रतिकृतीची शिवसृष्टी विद्यार्थ्यांचे सहाय्य घेऊन तयार केली.ह्या शिवसृष्टी मध्ये शिवनेरी,रायगड,प्रतापगड,देवगिरी अशा महत्त्वपूर्ण किल्ल्यांच्या प्रतिकृती शेणामातीपासून तयार केल्या. उपस्थित प्रत्येक गडकोट प्रेमी भरवून गेले होते.