तेल्हारा: अकोला भाजप जिल्हा सचिवपदी संदीपसिंह सोळंके, तेल्हाऱ्यात पक्षाला नवी ताकद!
Telhara, Akola | Nov 7, 2025 भारतीय जनता पार्टीच्या अकोला जिल्हा सचिवपदी तेल्हारा येथील निष्ठावान कार्यकर्ते संदीपसिंह सोळंके यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोळंके यांच्या नेतृत्वामुळे तेल्हारा तालुक्यात पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता पक्षातील कार्यकर्त्यांकडून आह