नागपूर ग्रामीण: वाडी पोलिसांची मोठी कारवाई; ५ चोरीचे गुन्हे उघड, एका आरोपीसह ४ अल्पवयीन ताब्यात
वाडी पोलिसांनी मंदिर आणि दुकान फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी सम्यक उत्तम वाटोळे याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेले ४ अल्पवयीन मुले देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत.३० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास लावा येथील राधा मोहन मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दानपेटीतील सुमारे ७५,००० रुपये चोरून नेले होते.