महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) सप्ताहाच्या निमित्ताने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून, पोलीस मुख्यालयातील परेड प्रांगणात आयोजित भव्य पोलीस प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनीत सायबर सेल, डायल ११२, वाहतूक शाखेसह विविध विभागांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. यावेळी सुमारे ३५०० विद्यार्थी व नागरिकांनी पोलीस दलाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. तसेच ८ जानेवारी रोजी पोली