अवकाळी आणि सलग सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार ते पाच दिवस सोयाबीन पाण्याखाली राहिल्याने दाण्यातील आर्द्रता प्रचंड वाढली असून दाणे काळे पडू लागले आहेत. परिणामी या सोयाबीनला मानक दर्जा न मिळाल्याने खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नकार दिला जात आहे.पणन महासंघाच्या माहितीनुसार, यंदा खरेदीसाठी 3 लाख 56 हजार 65 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.