आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्यावतीने राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय वैमानिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे व्यावसायिक वैमानिक परवाना एअरबस ए 320 टाईप रेटिंगच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.