खटाव: पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई, गांजा वाहतूक करताना तिघांना घेतले ताब्यात; एकूण सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
Khatav, Satara | Sep 26, 2025 सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर पुसेगाव शहरात गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धडक कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये एकूण तीन लाख पंधरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्यातून शुक्रवारी सकाळी ११ वाजता मिळालेल्या माहितीनुसार विनोद गुलाब कदम, रा. पांढरवाडी विसापूर, ता. खटाव. समाधान दिलीप खरात, रा.मलवडी, ता. माण आणि विधान सुनील दास यांना अटक करण्यात आली.