नागपूर ग्रामीण: नागपूरमध्ये उन्हाच्या तडाख्यानंतर वातावरणात अचानक बदल; सुटला सोसाट्याच्या वाऱ्या, अनेक ठिकाणी विजपूरवठा खंडित
नागपूर शहरात आज, २ मे रोजी निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळाला. दिवसभर कडक ऊन आणि घामाच्या धारांनी त्रस्त असलेल्या नागपूरकरांना सायंकाळी काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. तर काही ठिकाणचा वीज पुरवठा देखील खंडित झाला आज सकाळपासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली होती. मे महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा चढलेला असल्याने उन्हाच्या झळा तीव्र जाणवत होत्या. मात्र, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमा झाले