गंगाखेड: धनगर समाजाच्या रस्ता रोको आंदोलना दरम्यान गंगाखेड येथे अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी साठी जालना येथे दीपक भाऊ बोराडे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गंगाखेड येथे बुधवार एक ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सुरेश बंडगर यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पोलीस बांधवांनी व धनगर समाज बांधवांनी पकडून अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.