मालेगाव: मालेगावात भावमधुर गायनाची ' पाडवा पहाट ' मैफिल रंगली...
मालेगावात भावमधुर गायनाची ' पाडवा पहाट ' मैफिल रंगली... आज दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास दिवाळी पाडव्याच्या शुभ सकाळी मालेगावात ‘पाडवा पहाट’ या भावमधुर गायन मैफिलीने सूरांची सरिता वाहिली. मालेगावचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या गोरावाडकर वाडयात झालेल्या या कार्यक्रमात पहाटेच्या गारव्यात शास्त्रीय, भावगीते, नाट्यगीत आणि भक्तिगीतांनी वातावरण भारावले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या सुरेल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.