अहमदपूर: एसडीपीओ अरविंद रायबोले यांच्या पथकाची मोठी कारवाई! अवैध वाळू वाहतूक करणारा २० लाखांचा टिप्पर जप्त; दोघांवर गुन्हा दाखल
Ahmadpur, Latur | Oct 21, 2025 एसडीपीओ अरविंद रायबोले यांच्या पथकाची मोठी कारवाई! अवैध वाळू वाहतूक करणारा २० लाखांचा टिप्पर जप्त; दोघांवर गुन्हा दाखल उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणारा सुमारे २० लाख रुपयांचा हायवा टिप्पर जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.