चिखलदरा: जंगली डुक्करांचा खेलकृष्णाजी शेतशिवारात हैदोस; कापसाचे ४० हजारांचे नुकसान
मलकापूर रस्ता परिसरातील खेलकृष्णाजी शेतशिवारात आज सकाळी सुमारास ११ वाजता जंगली डुक्करांनी थैमान घालत शेतकरी अमोल भोंडे यांच्या शेतातील उभ्या कपाशीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन एकरांपैकी अर्धा ते पाऊण एकर क्षेत्रातील कपाशी पूर्णपणे चिरडून नष्ट झाल्याची माहिती मिळाली आहे.जंगली डुक्करांच्या या कृत्यामुळे शेतकरी भोंडे यांना तब्बल ४ ते ५ क्विंटल कापसाचे नुकसान सहन करावे लागले. आर्थिक मुल्यांकनानुसार अंदाजे ४० हजार हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.