समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात सत्यमेव जयते फार्मर कपच्या अनुषंगाने महिला बचत समुहाची पार पडली बैठक
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात सत्यमेव जयते फार्मर कपच्या अनुषंगाने शनिवारी 3 वाजता गावातील महिला बचतगटातील महिला पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांना येणाऱ्या खरीपाच्या हंगामात शेतीमध्ये बिज प्रर्कीया करणे रासायनिक खते कीडनाशकांचा कमीत कमी वापर करून चांगले पिक घेणे समृह शेती करुन चांगले उत्पन्न घेणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या