जालना: ट्रक चालकाच्या केबिनमधून मोबाईल चोरी करणारा आरोपी गंगापूरहून अटकेत; चंदनझिरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई..
Jalna, Jalna | Apr 18, 2026 ट्रक चालकाच्या केबिनमधून मोबाईल चोरी करणारा आरोपी गंगापूरहून अटकेत; चंदनझिरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई.. रात्रीच्या वेळी ट्रक चालक झोपेत असताना केबिनमधून मोबाईल व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीस चंदनझिरा पोलिसांनी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील पारधी वस्तीत करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी ट्रक चालक फारूख शाबु शेख यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ते जालना–संभाजीनगर रोडवरील एमआयडीसी