अकोल्याच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अनियमित कामांविरोधात वंचित बहुजन युवक आघाडीने आज ठिय्या आंदोलन केलं. आठ कोटी रुपयांच्या कामांमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कार्यकारी अभियंत्यांना सोमवारी काळ फासण्याचा इशारा देण्यात आला. काम वाटपात केवळ २२ टक्के काम दाखवून शंभरहून अधिक कामांचं वाटप केल्याचा दावा आघाडीने केला. या प्रकरणात आमदार आणि खासदारांच्या हस्तक्षेपामुळे अन्याय झाल्याचा आरोप वंचित आघाडीने केला आहे. राजेंद्र पातोडे, वंचित युवा महासचिव महाराष्ट्र प्रदेश यांनी दिल