कळमनूरी: कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत जाहीर
महाराष्ट्र जि प अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद गट आणि सर्व पंचायत समिती मधील गणाची आरक्षण सोडत करण्यात आली असून,कळमनुरी तालुक्यातील 11 जिल्हा परिषद गट व 22 पंचायत समिती गणा मधील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे .