तेल्हारा: वडिलांचं स्वप्न पूर्ण करत प्रगती जगताप ठरली राज्यात एसी प्रवर्गांमधून प्रथम जिल्हाभरातून प्रगतीच होत आहे स्वागत!
Telhara, Akola | Nov 5, 2025 अकोल्याच्या प्रगती जगताप हिने जिद्द, मेहनत आणी आत्मविश्वासाच्या जोरावर राज्यात पहिला क्रमांक मिळवला. वडिलांचं निधन झालं, स्वतः आजारातून बाहेर पडली, पण हार मानली नाही. नोकरी करत रोज ६-८ तास अभ्यास करून तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात अव्वल येऊन वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. तिचे वडील सुनील जगताप हे अकोला महापालिकेचे नगरसेवक होते. आता ती यूपीएससी परीक्षा तयारी करणार आहे.