आष्टी: धामणगाव येथील नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला
Ashti, Beed | Sep 16, 2025 तालुक्यातील धामणगाव येथील तीस वर्षीय अफरोज बशीर बागवान हा तरून नदीत पडून वाहून वाहून गेला होता. मात्र भर पावसात पोलिसांसह नागरिकांनी शोधल्यानंतर तब्बल तीन तासानी तरुणाचा मृत्यूदेह आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आष्टी तालुक्यात मागील चोवीस तासात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून ठिकठिकाणीच्या नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर आला आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास धामणगाव येथील तीस वर्षीय अफरोज बशीर बागवान असे त्याचे नाव आहे.