पुणे शहर: रास्ता पेठेत मेफेड्रोन खरेदी व्यवहारातून तीन तरुणांवर शस्त्राने वार, समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाच्या खरेदीसाठी गेलेल्या तीन तरुणांवर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना रास्ता पेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले आहेत.