मुकुंद नगर परिसरात एकाला चाकूने मारहाण, आरोपी विरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 17, 2025
आज बुधवार 17 सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी पोलिसांनी माहिती दिली की, 16 सप्टेंबरला रात्री एक वाजता फिर्यादी सुशील बालाजी गायकवाड वय 32 वर्षे राहणार मुकुंद नगर छत्रपती संभाजी नगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 15 सप्टेंबरला रात्री नऊ वाजता आरोपी अजय गणेश भागवत राहणार मुकुंद नगर छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्यादीला चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल हिवराळे हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.