जळगाव शहरातील अग्रवाल चौफुली येथे भरधाव वेगाने येणाऱ्या बुलेट मोटरसायकलने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने पतीपत्नी जखमी झाल्याची घटना शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता घडली आहे. या संदर्भात मंगळवारी 2 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.