नांदेड: बदर समितीची मुदतवाढ रद्द करून अनु.जातीच्या आरक्षणाचे उपवर्गिकरण जाहीर करा ; सकल मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Nanded, Nanded | Sep 16, 2025 न्यायधीश अनंत बदर समितीला देण्यात आलेली अनावश्यक मुदतवाढ तत्काळ रद्द करून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गिकरण तत्काळ जाहीर करणे आणि तोपर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गाची नोकर भरती स्थगित ठेवणे या मागणीचे निवेदन आज सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली असल्याची सविस्तर माहिती सकल मातंग समाज बांधव घाटे यांनी आज रोजी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय समोर आपल्या प्रतिक्रिया द्वारे दिली आहे.