पनवेल रेल्वे स्टेशनकडे मालधक्का रोडने जाणाऱ्या एका प्रवाशाला दुखापत करून त्याच्याकडील पैसे जबरीने लुटणाऱ्या एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. समीर कुमार महंती हे पनवेल येथून रेल्वे स्टेशनकडे मालधक्का रोडने पायी जात असताना, आरोपी ईद्रीस उर्फ बबल्या नियाज शेख याने त्यांना वाटेत अडवले. आरोपीने महंती यांना मारहाण करून शारीरिक दुखापत केली आणि त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने हिसकावून घेऊन घटनास्थळावरून पलायन केले होते.