अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे आज सकाळी किरकोळ कारणातून दोन गटात दगडफेक झाली. एका विशिष्ट समाजाकडून ही दगड फेक करण्यात आली. यात दोघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले हे घटनास्थळी दाखल होत अधिक माहिती जाणून घेत शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. हिंदूंवर दगडफेक करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल, असे ही त्यांनी म्हटले आहे.