महाबळेश्वर: खा.उदयनराजे यांनी किल्ले प्रतापगडावर भवानी मातेचे घेतले दर्शन; शाही दसरा सोहळा रद्द करत पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन
किल्ले प्रतापगडावर आई भवानीच्या चरणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले या बुधवारी सकाळी सात वाजता नतमस्तक झाले. महाराष्ट्रावरील आलेले संकट दूर करो, असे देवीला साकडे घातले. महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर काही ठिकाणी पूरस्थितीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे वारसदार खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेला निर्णय आज भावनिक ठरत आहे.