पाटोदा: आचारसंहितेमध्ये कमरेला गावठी कट्टा लावून हिंडणारा सौताडा येथून पोलिसांनी अटक केला, कोणाची तरी वाट पाहत उभा होता
Patoda, Beed | Nov 26, 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रधारकांविरुद्ध बीड जिल्हा पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने गावठी पिस्तूल बाळगणारा एक इसम पकडत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी शिवाजी बंटेवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विशाल मरकस मस्के (रा. सौताडा) हा गावातील एका हॉटेलसमोर कंबरेला गावठी पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या कोणाची तरी वाट पाहत उभा आहे