हवेली: हिंजवडीत अजित पवारांच्या निकटवर्तीयाच्या मुलावर तडीपार गुंडांचा हल्ला
Haveli, Pune | Oct 20, 2025 आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्य विनोदे यांच्यावर रविवारी दुपारी जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.या हल्ल्यात सुमित सदाशिव, विकी तीपाले, अथर्व शिंदे, गौतम कांबळे, बंटी ठाकरे आणि समाधान अशी सहा जणांची नावे समोर आली आहेत