धर्माबाद: महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात ग्राहकांचे आमरण उपोषण विज वितरण कार्यालयासमोर सुरु
धर्माबाद उपविभागा अंतर्गत महावितरणच्या व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहकांना अचानक वाढीव वीज बिल येणे, ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्वाक्षरी शिवाय बदललेल्या मीटरची चौकशी करावी व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, चुकीच्या मीटरमूळे जास्त बिल आकारून ग्राहकांना वीज चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अश्या मागणीसाठी विज वितरण कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून हे आमरण उपोषण सुरु आहे.