नगर: स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत जिजामाता आरोग्य केंद्रासह बूथ हॉस्पिटलमध्ये शिबिर
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या आरोग्य विभाग व महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यानगर शहरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ११ आरोग्य केंद्रांवर महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिर, जनजागृती उपक्रमां चे आयोजन करण्यात आले आहे