मानगाव: माणगाव तालुक्यातील मौजे सालेगाव येथील सुशोभित करण्यात आलेल्या उद्यानाला नामफलकाचा अनावरण सोहळा
Mangaon, Raigad | Oct 25, 2025 आज शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास माणगाव तालुक्यातील मौजे सालेगाव येथील सुशोभित करण्यात आलेल्या उद्यानाला स्व. बाबुरावजी भोनकर उद्यान या नामफलकाचा अनावरण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माझ्या राजकीय आयुष्यात त्यांच्यासोबत अनेक प्रसंग अनुभवता आले. राजकारणात संवाद घडवून आणण्यासाठी माध्यमाची गरज भासत असते आणि ती भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी मोठी गती दिली.त्यांचे आणि माझे राजकारणाच्या पलीकडे एक कौटुंबिक नातं होतं. आजच्या या नामफलक अनावरणाच्या निमित्ताने मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.