जिंतूर: चांदज शिवारात कारला धडक दिल्याप्रकरणी
ट्रॅक्टर चालकाविरोधात बोरी पोलीसात गुन्हा दाखल
जिंतूर तालुक्यातील चांदज शिवरातील करपरा नदी पुलाजवळ मारोती कार क्र. MH 24 BL 7651 आणि ट्रॅक्टर क्र. MH 22 AD 1215 यांच्यात समोरासमोर धडक झाल्याची घटना 24 ऑक्टोबर रोजी रात्री 10 45 वाजता घडली. या प्रकरणी शेख जावेद सलीम यांनी बोरी पोलीसात तक्रार दिली की ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने अपघात झाला असून, कारचे नुकसान झाले असल्याची फिर्याद दिल्याने बोरी पोलीसात रविवार 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता गुन्हा दाखल.