जालना: फडणवीस सरकारमध्ये पैशाशिवाय फाईल हालत नाही; महिलांच्या शोषणाला फडणविसच जबाबदार : श्याम मानव
Jalna, Jalna | May 23, 2026 फडणवीस यांच्या सरकारमध्ये पैशाची देवाण-घेवाण केल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. मी यापूर्वी दोन सरकारमध्ये काम केले, मात्र एकही पैसा खर्च करावा लागला नाही. फडणवीस सरकारमध्ये मात्र पैसे दिल्याशिवाय फाईल हालत नाही, असा गंभीर आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शाम मानव यांनी केला. शनिवार दि. 23 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ते जालना येथे आले असता त्यांनी हा आरोप केला. सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी 15 दिवसांत जीआर काढण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही.