अकोट: श्री संत नरसिंग महाराजांची पालखीचे गुरु पूजेसाठी उमरा येथे प्रस्थान करुन परतली
Akot, Akola | Nov 8, 2025 श्री संत नरसिंग महाराजांची पालखीचे गुरुपूजनासाठी उमरा येथे शनिवारी प्रस्थान झाले. गुरुपूजन झाल्यानंतर पालखी संध्याकाळी ७ वाजता अकोट येथे परत मंदिरात पोहोचली उमरा येथील श्री संत कुवतशा अली मियासाहेब हे श्री नरसिंग महाराज यांचे गुरु होते, श्री संत नरसिंग महाराजांचे उपस्थितीत त्यांनी समाधी घेतली तत्पूर्वी भक्तिमार्ग दाखवून त्यांचा उद्धार करावा असे त्यांना आवाहन केले तेव्हापासून महाराजांनी सतत यात्रा सुरू केली असून ती आजतागायत तशीच सुरू आहे ही यात्रा कार्तिक पंचमीला होते.